पेट्रोल दरवाढीविरूद्ध धक्का मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:53+5:30

मूलमधील गांधी चौकातून सदर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी नारेबाजी करत गाडीला धक्का मारत निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयात वीज बिलांची होळी करून वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.

Push strike against petrol price hike | पेट्रोल दरवाढीविरूद्ध धक्का मारो आंदोलन

पेट्रोल दरवाढीविरूद्ध धक्का मारो आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : कोरोनाच्या महासंकट काळात महावितरणने अवाढव्य व चुकीचे वीज बिल देयके पाठवली. तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केल्याचा आरोप करून उलगुलान संघटनेतर्फे शनिवारी धक्का मारो आंदोलन करण्यात आले.
मूलमधील गांधी चौकातून सदर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी नारेबाजी करत गाडीला धक्का मारत निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयात वीज बिलांची होळी करून वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, प्रशांत उराडे, निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, धनराज चिलमुलवार, विश्वास कोल्हे, आरिफ खान पठाण, अक्षय दुमावार, मिथुन सिंग पटवा, अनिकेत वाकडे रितिक शेंडे, प्रणव रायपुरे, अजय दहिवले, सचिन पावडे, वतन चिकाटे, रोहित शेंडे तसेच उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Push strike against petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.