ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात संस्थेचे सचिव ना. गो .थुटे, संचालक रामदास दहाडकर, सो. मा. भोंगळे, श्वेता संजय देवतळे आणि करण देवतळे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी स्व. संजय देवतळे यांच्या आठवणीतील ''लोकनेते स्व. संजयबाबू देवतळे'' या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झाले. महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी स्व. दादासाहेब देवतळे ते स्व. संजय देवतळे यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला. डॉक्टर विजय देवतळे यांनी स्व. संजय देवतळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या सालस आणि स्वभावाच्या आठवणी उपस्थितांपुढे मांडल्या. प्रास्ताविक ना. गो. थुटे यांनी, तर संचालन नंदकिशोर मसराम यांनी केले.
210921\img_20210921_100850.jpg
warora