शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

शिफारसप्राप्त कापूस वाणांचीच करा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:21 PM

जिल्ह्यात कापूस या नगदी पिकाखालील क्षेत्र मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात कापूस लागवड होवू लागल्याने बोगस बियाणे विक्रीचा धोका आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या हंगामात शिफारसप्राप्त कापूस बियाणे वाणांचीच खरेदी करावी. बोगस बियाण्यांची विक्री सुरू आल्यास तक्रार करण्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

ठळक मुद्देकृषी विभाग : बोगस बियाण्यांविरुद्ध तक्रार करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कापूस या नगदी पिकाखालील क्षेत्र मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात कापूस लागवड होवू लागल्याने बोगस बियाणे विक्रीचा धोका आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या हंगामात शिफारसप्राप्त कापूस बियाणे वाणांचीच खरेदी करावी. बोगस बियाण्यांची विक्री सुरू आल्यास तक्रार करण्याचे कृषी विभागाने कळविले आहे.२००६ पासून जनुकीय परावर्तीत तंत्रज्ञानावर आधारीत बियाणांचा म्हणजेच बोंड अळीला प्रतिकारक अशा बीटी बियाणांचा वापर होत आहे. बीटी वाणाखालील कापूस क्षेत्र जिल्ह्यात दरवर्षी वाढत आहे. एकूण जमिनीच्या तुलनेत कापूस क्षेत्राच्या लागवडीचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. या बीटी वाणांना केंद्रीय पर्यावरण विभागाअंतर्गत जी.ई.ए.सी. या समितीमार्फत मान्यता दिली जाते. अशा परवानगीप्राप्त व महाराष्ट्र राज्याकरिता शिफारस असलेल्या कापूस वाणांनाच राज्यात विक्रीस परवानगी दिली जाते. मागील वर्षांपर्यंत जी.ई.ए.सी. मान्यताप्राप्त वाणांच्या मूळ उत्पादक कंपनीबरोबरच विपणन कराराद्वारे को-मार्केटिंग करणाऱ्या इतर कंपन्यादेखील विक्री करीत होत्या. अशा को-मार्केटिंग कराराद्वारे विक्री करताना जी.ई.ए.सी.ने मंजूर केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर वेगवेगळे ब्रँडनेम टाकून एकच वाण अनेक ब्रँडच्या नावाने विक्री करण्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. विविध कंपनीच्या ४०२ वाणांची गतवर्षी एकूण ६२४ वेगवेगळ्या नावाने राज्य व जिल्ह्यात विक्री करण्यात येत होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होऊन प्रसंगी फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे २०१८ च्या खरीप हंगामापासून जी.ई.ए.सी. ने मंजूर केलेल्या नावानेच विक्री करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. मूळ उत्पादक कंपनीने कापूस बियाणांचे पॅकींग करताना जी.ई.ए.सी. मान्यताप्राप्त नाव ठळकपणे दिसेल अशा स्वपात पॅकींग व लेबलिंग करण्याचे निर्देश दिले. सदर कंपनी त्या नावाव्यतिरिक्त स्वत:चा ब्रँडनेम टाकू शकतील. मात्र एका वाणाकरिता एकच ब्रँडनेम निश्चिम करावा लागेल.मूळ उत्पादकांच्या मंजूर वाणांची को-मार्केटिंगद्वारे इतर कंपनीस विक्री करावयाचे असल्यास मूळ उत्पादकांच्या पॅकिंग व लेबल प्रमाणेच विक्री करण्याचे निर्देश देण्या आले आहे़ त्यामुळे राज्यात एका वाणांची एकाच ब्रँडनेमद्वारे विक्री होईल. बी.टी. कापूस वाणांमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतीकार करण्याची क्षमता तयार झाल्याने गतवर्षी शेंदरी बोंड अळीच्या प्रार्दूभाव वाढृून कापूस उत्पादनात मोठी घट आली होती़गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने कमी व मध्यम कालावधीच्या (१८० दिवस) वाणांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे यंदा १८० दिवसांपेक्षा जास्त दिवसांतील वाणा विक्रीला मंजुरी देण्यात आली नाही. खरीप २०१८ करिता ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांनाच विक्री परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.३७० कापूस वाणांचे बियाणे बाजारातयंदाच्या खरीप हंगामासाठी १८० दिवसांपेक्षा जास्त दिवसांतील वाणा विक्रीला मंजुरी देण्यात आली नाही. केवळ ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांच्या विक्रीला परवानगी मिळाली. हे बियाणे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे. या वाणांव्यतीरिक्त इतर वाण विक्री होताना आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.