वैद्यकीय महाविद्यालयासाठी वीज जनरेटर खरेदीला मान्‍यता द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:31+5:302021-03-15T04:26:31+5:30

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय चंद्रपूर येथे विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला त्‍वरित मान्‍यता देण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा ...

Purchase of power generator for medical college should be approved | वैद्यकीय महाविद्यालयासाठी वीज जनरेटर खरेदीला मान्‍यता द्यावी

वैद्यकीय महाविद्यालयासाठी वीज जनरेटर खरेदीला मान्‍यता द्यावी

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय चंद्रपूर येथे विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला त्‍वरित मान्‍यता देण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्‍याकडे केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय ही अतिशय महत्त्वाची आरोग्‍य संस्‍था असून वैद्यकीय शिक्षणाचे प्रशस्‍त दालन आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील रुग्‍ण या ठिकाणी उपचारार्थ येत असतात. या महाविद्यालय व रुग्‍णालयासाठी ४० लाख रु. किमतीचा विद्युत जनरेटर खरेदीचा प्रस्‍ताव महाविद्यालय प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे व शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्‍तावाला त्‍वरित मान्‍यता देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह वैद्यकीय शिक्षण व संचालक विभागाच्या सचिव यांच्‍याकडे केली आहे.

Web Title: Purchase of power generator for medical college should be approved