ब्रह्मपुरी तालुक्यातील धानपीक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:29 IST2017-10-29T23:29:10+5:302017-10-29T23:29:29+5:30

तालुक्यातील अनेक गावातील धानपिकावर तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया अळ्यांच्या विविध रोगांच्या प्रादुर्भावाने हाती येणारे धानाचे पीक नष्ट झाले आहे.

Puranpak destroyed in Brahmapuri taluka | ब्रह्मपुरी तालुक्यातील धानपीक नष्ट

ब्रह्मपुरी तालुक्यातील धानपीक नष्ट

ठळक मुद्देआर्थिक मदत द्या : अन्यथा १ नोव्हेंबरला एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावातील धानपिकावर तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया अळ्यांच्या विविध रोगांच्या प्रादुर्भावाने हाती येणारे धानाचे पीक नष्ट झाले आहे. यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व गाव परिसरातील धान पिकाचे सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा व नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी किसान क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक विनोद झोडगे यांनी केली आहे.
ब्रह्मपुरी तालुका हा धान उत्पादन तालुका म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारच्या तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या धान पिकावर तुडतुडा, करपा, मावा यासारख्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे ऐन हातात येणाºया उत्पादनाचे नुकसान होण्याची भिती शेतकºयांमध्ये निर्माण झालेली आहे. भात पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भात पीक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. महागडी औषधी फवारणी करीत असतानाही रोग आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र ब्रह्मपुरी तालुक्यात दिसून येत आहे. परंतु आतापर्यंत शासन व प्रशासनाच्या वतीने शेताचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शासनाने तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या धान पिकाचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता निदर्शने करण्याचा इशारा शेतकरी सुकानु समिती, किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद झोडगे, प्रा. अमृत नखाते, मिलिंद भनारे, अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, जि.प. सदस्य प्रमोद चिमूर, नामदेव नखाते, महेश पिल्लारे, अविनाश राऊत, मोंटू पिल्लारे, शरद ठाकरे आदी पदाधिकाºयांनी दिला आहे.

Web Title: Puranpak destroyed in Brahmapuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.