उकिरडे शोधणारा पंजाब बनला स्वच्छता दूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:47 AM2019-08-17T00:47:19+5:302019-08-17T00:49:20+5:30

खडसंगी येथील पंजाब सावरकर हा उकिरडे शोधणारा आज गावासाठी स्वच्छतादूत झाला आहे. मागील २५ वर्षांपासून अबोल असलेल्या पंजाबने ऊन्ह, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता गावातील उकिरडयातील टाकाऊ सामान उचलण्याचे काम करीत आहे.

Punjab became a hygiene envoy looking for pigs | उकिरडे शोधणारा पंजाब बनला स्वच्छता दूत

उकिरडे शोधणारा पंजाब बनला स्वच्छता दूत

Next
ठळक मुद्देउकिरड्यातून केली लाखोंची बचत : सोबत गावाचीही करू लागला स्वच्छता

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : खडसंगी येथील पंजाब सावरकर हा उकिरडे शोधणारा आज गावासाठी स्वच्छतादूत झाला आहे. मागील २५ वर्षांपासून अबोल असलेल्या पंजाबने ऊन्ह, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता गावातील उकिरडयातील टाकाऊ सामान उचलण्याचे काम करीत आहे. हे करीत असताना तो गावाची स्वच्छताही करतो. त्यामुळे तो आज गावासाठी एकप्रकारे स्वच्छता दूत बनला आहे. तर उचलेल्या टाकाऊ वस्तू भंगारात विकून त्याने लाखो रुपयांची बचतही केली आहे.
चिमूर तालुक्यातील तीन हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या खडसंगी गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या पंजाब सावरकर या ५६ वर्षीय इसमाची ही कहाणी आहे. खडसंगी येथील श्रावण सावरकर हे अनेक वर्षांपासून राष्ट्रसंताच्या विचाराचे प्रचारक आहेत. गावात वाढई काम करून कुटुंब चालवत होते. त्याच्या संसारात चार अपत्य. त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पंजाब हा लहानपणापासून तल्लख बुद्धीचा. त्यामुळे त्याने दहावी बोर्डाची परीक्षा त्याकाळी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली व नंतर आयटीआय मोटार मेकॅनिक पास केले. नंतर वरोरा येथील आनंदवन महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान त्याला घोडपेठ येथे नोकरीची संधी आली. मात्र दरम्यानच्या काळात पंजाबची मानसिक स्थिती बिघडली व तो मनोरुग्णासारखा वागू लागला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले . मात्र काही फायदा झाला नाही.
बालपणापासून हुशार असलेल्या पंजाबवर मनोरुग्ण म्हणून जगण्याची नामुष्की आली. त्यामुळे तो दिवसरात्र दर दर भटकंती करू लागला. मात्र तो कुणालाही काही बोलायचा नाही तर आपल्या भावना इशाºयाने सांगू लागला. त्यामुळे घरी व गावातील नागरिकांना पंजाब मुका असल्याचे वाटत होते. गावात फिरून लोकांनी उकिरडयात फेकलेल्या रिकाम्या काचेच्या बॉटल्स, लग्नात पंगतीतील प्लास्टिक, खरडे इत्यादी टाकाऊ वस्तू तो उचलू लागला. त्या सर्व वस्तू आणून घरी एका खोलीत जमा करायचा. आणि महिन्याकाठी विकायचा. हे करीत असताना तो उकिरड्याची स्वच्छताही करू लागला.
गावातील उकिरडे शोधणाºया पंजाबने स्वत:च पोस्टात खाते उघडले व या खात्यात आलेले पैसे जमा करू लागला. आजच्या घडीला पंजाबच्या खात्यात तीन लाख ३८ हजार रुपये जमा असल्याचे पोस्टातून सांगितले जाते. पुढे पंजाबच्या नंतर या रकमेचा उत्तराधिकारी कोण, हासुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. मनोरुग्ण व मौन व्रत धारण करून जगत असलेल्या पंजाबच्या या कार्याने खडसंगी गावातील घाण, कचरा स्वच्छ होत आहे.
पंजाबचा हा नित्यनियमच
स्वत: स्वच्छतेची जाण नसल्यासारखे राहणीमान असलेला अबोल पंजाब रोज सकाळी खांद्यावर एक पोत्याची चुंगडी घेऊन गावाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गावातील नाल्या, कचरा कुंडया फिरतो. त्यातील काचेच्या बॉटल्स, प्लास्टिक गोळा करून त्या नाल्याची व उकिरडयाची स्वच्छता करतो. हे काम मात्र क्षुल्लक वाटत असले तरी मात्र अबोल पंजाबची कृती ही स्वच्छता दूतासारखीच आहे.

Web Title: Punjab became a hygiene envoy looking for pigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.