नागभीड ‘लोकमत शिवार पुरवणी’चे प्रकाशन
By Admin | Updated: April 19, 2016 05:23 IST2016-04-19T05:23:17+5:302016-04-19T05:23:17+5:30
लोकमतच्या नागभीड तालुका शिवार पुरवणीचे विमोचन येथील स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात

नागभीड ‘लोकमत शिवार पुरवणी’चे प्रकाशन
नागभीड : लोकमतच्या नागभीड तालुका शिवार पुरवणीचे विमोचन येथील स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सोमवारी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागभीडचे तहसीलदार व नगर परिषदेचे प्रशासक समीर माने होते. ठाणेदार बी.डी. मडावी, प्राचार्य अमीर धम्माणी, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष संजय गजपुरे, नागभीड पं.स. माजी उपसभापती दिनेश गावंडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे, प्रा. डॉ. मोहन जगनाडे, नागभीडचे माजी सरपंच जहागीर कुरेशी, पंचायत विस्तार अधिकारी पी. पी. तोंडरे, परशुराम बागडे, अतुल झोटींग यांची याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
प्रारंभी कान्पा येथील वार्ताहर शरद देवाडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.लोकमतचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोकमतने लोकांच्या समस्या सातत्याने मांडत असतो. पुरवणीच काय अन्य उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा लोकमत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत आला आहे, असे विचार यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी लोकमत समाचारचे प्रतिनिधी विलास बाहेकर, वितरण प्रतिनिधी मंगेश येरणे, तळोधीचे वार्ताहर संजय अगडे, चिंधीचकचे वार्ताहर राहुल रामटेके यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन शरद देवाडे यांनी तर आभार तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)