ब्रह्मपुरी ‘शिवार’ पुरवणीचे प्रकाशन
By Admin | Updated: March 27, 2016 00:37 IST2016-03-27T00:37:24+5:302016-03-27T00:37:24+5:30
लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून ग्रामीण परिसरापासून ते शहरी भागापर्यंत शोषित, पिडीत व अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने होत असते.

ब्रह्मपुरी ‘शिवार’ पुरवणीचे प्रकाशन
ब्रह्मपुरी : लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून ग्रामीण परिसरापासून ते शहरी भागापर्यंत शोषित, पिडीत व अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने होत असते. तालुक्याच्या समस्या व तालुक्याची विविध विषयातील सर्वांगिन माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने लोकमतच्यावतीने ब्रह्मपुरी तालुका ‘शिवार’ पुरवणी प्रकाशित केली. त्याचा प्रकाशन सोहळा शनिवारी स्थानिक डॉ.वाठेकर सभागृहात शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदचे मुख्याधिकारी मंगेश खवले होते. उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक ओमप्रकाश अंबाडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे, आय.एम.एचे तालुका सचिव डॉ. भारत गणवीर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, लोकमत सखी मंच संयोजिका शिला चरपटे, उपसंयोजिका साधना केळझरकर, निवासी तहसिलदार पुंडेकर, मनिषा बगमारे, नगरसेविका अर्चना खंडाते, लोखंडे बुक डेपोचे संचालक रवी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी ‘शिवार’ पुरविणीचे भरभरून कौतुक केले. या पुरवणीत नवीन माहिती असल्याने ती पुरवणी संग्रही ठेवण्याजोगी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संचालन प्रा.डॉ.मोहन वाडेकर, आभार लोकमत तालुका प्रतिनिधी प्रा.डॉ.रवी रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संजय बिजवे, प्रमोद फटींग, आकाश रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)