ब्रह्मपुरी समृद्ध वाटचाल पुरवणीचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:37 IST2018-07-20T22:37:08+5:302018-07-20T22:37:41+5:30
लोकमत समृद्ध वाटचाल पुरवणी तालुका ब्रह्मपुरीचे गुरुवारी डॉ. वाडेकर सभागृहात थाटात प्रकाशन करण्यात आले.

ब्रह्मपुरी समृद्ध वाटचाल पुरवणीचे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : लोकमत समृद्ध वाटचाल पुरवणी तालुका ब्रह्मपुरीचे गुरुवारी डॉ. वाडेकर सभागृहात थाटात प्रकाशन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता बनपूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, मुख्याधिकारी मंगेश खवले, लोकमत सखी मंच तालुका संयोजिका साधना केळझरकर, तालुका प्रतिनिधी प्रा. डॉ. रवी रणदिवे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक खोब्रागडे यांनी पुरवणीचे कौतूक करून शेतीविषयक प्रश्नाला वाचा फोडण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन केले. तहसीलदार चव्हाण यांनी लोकमत नं. १ चे वृत्तपत्र असून नेहमीच समाजपयोगी भावना जपत असल्याचे प्रतिपादन केले. तर मुख्याधिकारी खवले यांनी शहर विकासात लोकमत नेहमी पाठीशी असल्याने शहर स्मार्ट बनविण्यास ही पुरवणी लाभदायक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी नगराध्यक्ष योगीता बनपूरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, संचालन तालुका प्रतिनिधी प्रा. डॉ. रवी रणदिवे तर आभार प्रा.डॉ.धनराज खानोरकर यांनी मानले. यावेळी मधुकर मेश्राम, संजय बिजवे, वितरक फटींग, सखी मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.