जनसंपर्क, जनसंवादाच्या माध्यमातून लोकसेवा
By Admin | Updated: June 3, 2014 23:59 IST2014-06-03T23:59:29+5:302014-06-03T23:59:29+5:30
आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार सुधीर मुनगंटीवार राबविणार आहे. या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ श्री महाकाली मंदिर परिसरातून करण्यात आला.

जनसंपर्क, जनसंवादाच्या माध्यमातून लोकसेवा
अभिनव उपक्रम : मुनगंटीवार यांची ‘आमदार आपल्या दारी संकल्पना’
चंद्रपूर :‘आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार सुधीर मुनगंटीवार राबविणार आहे. या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ श्री महाकाली मंदिर परिसरातून करण्यात आला.
जनसंपर्क अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विधीवत पूजा करून करण्यात आले. यावेळी, भाजपा नेत्या वनिता कानडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे, हरिश शर्मा, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणुका दुधे, रामपाल सिंह, अंजली घोटेकर, हनुमान काकडे, रंजना किन्नाके, जिल्हा परिषद सदस्य शांताराम चौखे, किशोर जोरगेवार, फारुख शेख, प्रा. ज्योती भुते, विशाल निंबाळकर आदी उपस्थित होते.
फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी ही संकल्पना आमदार सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात राबवित आहेत. फिरते जनसंपर्क कार्यालय अद्ययावत असून मतदार संघातील प्रत्येक गावात हे जनसंपर्क कार्यालय फिरणार आहे. या फिरत्या जनसंपर्क कार्यालयातील भाजपा पदाधिकारी व त्यांचे सहकारी गावातील नागरिकांशी संपर्क व संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेतील, त्यांची निवेदने स्वीकारणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या व अडचणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे, जनसंपर्क कार्यालयातून थेट आमदाराशी नागरिकांना बोलतासुद्धा येणार आहे. (नगर प्रतिनिधी)