जिवती येथे हिवतापावर जनजागृती
By Admin | Updated: May 8, 2015 01:12 IST2015-05-08T01:12:39+5:302015-05-08T01:12:39+5:30
जीवती प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी एका कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली.

जिवती येथे हिवतापावर जनजागृती
जीवती : जीवती प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी एका कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली.
अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. मुरंबीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डी.टी. नन्नावरे, वैद्यकीय अधिकारी जिवती के.जी. कोरडे, डॉ. हेमंत फुलझले, डॉ. भूषण मोरे, डॉ. शालिनी तरोणे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी आदिवासी दुर्गम क्षेत्रातील तालुका जिवती येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता सदर क्षेत्रात हिवतापाचा प्रादूर्भाव अधिक आढळून येतो.
हिवताप या आजाराला आळा घालण्यासाठी जनतेने विविध हिवताप प्रतिबंधक उपाययोजनांचा वापर करावा तसेच तालुक्यात आरडीकेचा वापर, एसीटीचा समूळ उपचार आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकामार्फत जास्त प्रमाणात होण्यासाठी मार्गदर्शन केले. सोबतच जिल्हास्तरावरुन हिवताप विरोधी औषधसाठा वेळोवेळी पुरविण्यासंदर्भात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, डासांच्या प्रतिबंधासाठी खिडक्यांना जाळ्या लावाव्या, गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईपला जाळ्या बांधाव्या, मच्छरदाणीचा वापर करावा, नाल्या वाहत्या करणे, किटकनाशक फवारणी करणे, आदी उपाययोजना यावेळी सांगितल्या. संघर्ष बहुउद्देशिय सामाजिक संस्था चंद्रपूरतर्फे कलापथक नाटय कार्यक्रमाद्वारे हिवताप आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. उपकेंद्र नगराळा येथेही जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)