वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:49+5:302021-01-17T04:24:49+5:30
आक्सापूर : चंद्रपूर जिल्ह्याला वाघाच्या रूपाने वरदान लाभले आहे. ताडोब्यासह जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाघांचा व वन्यजीवांचा वावर आहे. ...

वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती महत्त्वाची
आक्सापूर : चंद्रपूर जिल्ह्याला वाघाच्या रूपाने वरदान लाभले आहे. ताडोब्यासह जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाघांचा व वन्यजीवांचा वावर आहे. पण अधामधात मानव वन्यजीवाचा संघर्ष टोकाला पोहचतो. यात कधी वन्यजीवाचा तर कधी मानवांचा बळी जातो. असे प्रकार थांबविण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. निसर्ग सखा संस्थेने मानव-वन्यजीव संघर्षावर तयार केलेली चित्रफीत ही जागृतीचे प्रभावी माध्यम ठरावे, असा आशावाद राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
निसर्ग सखा संस्था व मुंबई येथील पर्यावरण मित्र हंस दलाल यांनी मानव-वन्यजीव संघर्षावर एक चित्रफीत तयार केली. या चित्रफितीचे उदघाटन करताना ते बोलत होते. निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे, पर्यावरण मित्र हंस दलाल, नगरसेवक राकेश पून, सूरज माडूरवार, चेतनसिंह गौर, सुनील फुकट आदींची उपस्थिती होती. वनविभागाद्वारे हा संघर्ष टाळण्यासाठी तयार केलेल्या योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यत पोहोचावी या उदात्त हेतूने ही चित्रीत तयार करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील शोषित खोब्रागडे, रुतुजा गुरुनुले, नाजुका गेडाम, राजू खोब्रागडे, नीलेश देशमुख, मुन्ना भगत, गौरव शिरोडकर यांच्यासह अनेकांनी उपक्रमात सहभाग दर्शविला.