महिलांच्या कायदेविषयक अधिकारांविषयी जनजागृती

By Admin | Updated: September 4, 2015 01:01 IST2015-09-04T01:01:37+5:302015-09-04T01:01:37+5:30

स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीतर्फे महिलांचे कायदे विषयक अधिकार या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

Public awareness about women's legal rights | महिलांच्या कायदेविषयक अधिकारांविषयी जनजागृती

महिलांच्या कायदेविषयक अधिकारांविषयी जनजागृती

विविध कायद्याची दिली माहिती : सरदार पटेल महाविद्यालयाचे आयोजन
चंद्रपूर : स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीतर्फे महिलांचे कायदे विषयक अधिकार या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. महिला सहाय्यक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा खरसान यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले होते. प्रमुख अतिथी म्हणून पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार, महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. जयश्री धांडे आदी उपस्थित होते.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंधक घालण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. विशाखा जजमेंट व महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण, अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार महाविद्यालयीन स्तरावर महिला तक्रार निवारण समितीचे गठन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. समितीच्या प्रमुख डॉ. राजलक्ष्मी कुळकर्णी यांनी प्रास्ताविकातून समितीच्या कार्याविषयी व उद्देशांविषयी माहिती दिली.
वर्षा खरसान यांनी, विविध चित्रफितीद्वारे आणि स्लाईड शोच्या माध्यमातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांना या विषयाच्या गांभीर्याची जाणीव करुन दिली. तसेच महिलाविषयी असणाऱ्या कायद्यांची व त्यातील तरतुदींविषयी आणि होणाऱ्या शिक्षेविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरानाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनातून उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले यांनी महाविद्यालयीन स्तरावर युवक युवतींना एकत्र शिकताना आणि आजच्या फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपच्या युगात या विषयाचे महत्त्व विषद केले.
स्त्रीयांविषयीच्या कायद्याबाबत जागरुकता निर्माण करावी, यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा कत्तुरवार हिने तर आभारप्रदर्शन प्रा. वनश्री लाखे यांनी मानले.
कार्यक्रमाला माया कांबळे, महिला तक्रार निवार समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रमोद नारळे, गुरुदास शेंडे, राजेश इंगोले, प्रतिमला सोरते, सुवर्णा कुलटे, प्रवीण मडावी आदीनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Public awareness about women's legal rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.