आचार संहितेत वनोपजांचा जाहीर लिलाव
By Admin | Updated: November 9, 2016 02:01 IST2016-11-09T02:01:56+5:302016-11-09T02:01:56+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील चार नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने

आचार संहितेत वनोपजांचा जाहीर लिलाव
ब्रह्मपुरी विभागातील प्रकार : कारवाईची मागणी
कोठारी: चंद्रपूर जिल्ह्यातील चार नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १७ आॅक्टोबरपासून आदर्श आचार सहिता लागू केली आहे. यात वनविकास महामंडळातील वनोपजांचा होणारा जाहीर लिलाव रद्द करण्यात आला. मात्र ब्रह्मपुरी वनविभागात लिलाव घेण्यात आल्याने आचार संहितेचा भंग झाला असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी अनेक खरेदीदारांनी केली आहे.
ब्रह्मपुरी विभागातील वनोपजाचा जाहीर लिलाव बल्लारपूर येथे २१, २२ व आक्टोबर घेण्यात आला. त्यात खरेदीदारांची संख्या अत्यल्प होती. उपस्थित खरेदीदारांची संख्या व आंचार संहिता लागू असल्याने लिलाव घेण्यात येवू नये अशी मागणी अनेकांनी केली. मात्र विभागीय व्यवस्थापकांनी मागणी धुडकावित लिलाव घेतला. तसेच ६ व ७ नोव्हेंबरला ब्रह्मपुरी स्थानिक कार्यालयांकडून वनोपजांचा लिलाव घेण्यात आला. जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर वनविकास महामंडळाच्या पश्चिम चांदा वनप्रकल्प विभाग चंद्रपूर, मध्यचांदा वनप्रकल्प विभाग बल्लारपूर यांनी आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये होणारे जाहीर लिलाव रद्द केले. त्यात अपवाद ब्रह्मपुरी वनप्रकल्प विभाग ब्रह्मपुरी आहे. जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगर परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणुका असल्यास संपूर्ण जिल्ह्याकरिता आदर्श आचार संहिता लागू करण्यात आल्याचे संदर्भ क्र. दोन मध्ये नमुद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह, राजुरा, वरोरा, मूल या नगर परिषदा व सिंदेवाही नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. उपसचिव राज्य निवडणूक आयोगाप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यासाठी आचार संहिता लागू आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर आचार संहितेचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे प्रत्येक आगारात जावून लिलाव करणे शक्य नाही.स्थानिक खरेदीदारांचा तसेच याच नगर परिषदेच्या क्षेत्रातील खरेदीदारांचा सहभाग असणार असल्याने या काळात होणाऱ्या लिलावत आंचारसिंहतेचा भंग होवू शकतो. असे मत व्यक्त करीतअसेन विभागीय व्यवस्थापकांनी जाहिर लीलाव रद्द केले.
ब्रह्मपुरी विभागीय व्यवस्थापकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राला बेदखल करीत आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये वनोपजाचा जाहीर लिलाव बल्लारपूर व ब्रह्मपुरीत घेवून आचारसंहितेचा भंग केल्याची प्रतिक्रिया खरेदीदारांनी व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे.
जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणूका असून स्थानिक नगर परिषद क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू आहे, अशी प्रतिक्रिया महाव्यवस्थापक एस. एस. डोळे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र लिलावामुळे आचारसंहितेचा भंग आहे काय, यावर बोलण्याचे टाळले. (वार्ताहर)