जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:31+5:302021-04-07T04:29:31+5:30

शासनाने रिक्त पदे भरावीत चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची ...

Provide firewood | जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे

जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे

शासनाने रिक्त पदे भरावीत

चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे़. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत़. पण या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही़. त्याचा अनिष्ट परिणाम अंमलबजावणीवर होत आहे.

गतिरोधकाअभावी अपघाताची शक्यता

कोरपना : येथील बसस्थानक परिसरात चंद्रपूर, वणी, आदिलाबाद आदी शहरातून मोठ्या प्रमाणात वाहनधारक येतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी गतिरोधक तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त

चिमूर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात होती. मात्र याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. मागील पंधरवड्यात संततधार पावसाने रस्ता उखडला.

Web Title: Provide firewood