धान उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:24 IST2017-11-02T00:24:17+5:302017-11-02T00:24:28+5:30
ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांच्या शेतात तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया विविध रोगांनी कहर केल्यान भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

धान उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांच्या शेतात तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया विविध रोगांनी कहर केल्यान भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या पिकाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. .
ब्रह्मपुरी, नागभीड तालुके हे धान उत्पादन करणारे तालुके म्हणून ओळखले जातात. विविध प्रकारच्या तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या धान पिकावर यंदा तुडतुडा, करपा, मावा यासारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भात पीक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विविध प्रकारच्या औषधांचे फवारण्या करूनही रोगांवर नियंत्रण होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही शेतकºयांनी हिंमत ठेवून करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयामध्ये सरकारविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. शासनाने व प्रशासनाने ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या शेतातील धान पिकाचे सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यासह संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने एकरी २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी. याकरिता बुधवारी शेतकरी सुकाणू समिती किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीद्वारा ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयासमोर धानाच्या पेंढ्या दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देताना तालुका किसान क्रांती समन्वयक विनोद झोडगे, प्रा.अमृत नखाते, नामदेव नखाते, डॉ. प्रेमलाल मेश्राम, अॅड. गोविंद भेंडारकर, गोपाल मेंढे, डॉ.विलास मैंद, रामदास कामडी, अनिल कांबळे, प्रकाश खेवले, भगवान मेश्राम, भाऊराव राऊत, शरद ठाकरे, सरपंच बोधडा, महेश पिलारे, चिंतामण म्हस्के, किसन मेश्राम आदींसह पिंपळगाव, सोंद्री, भालेश्वर, लाडज, चिखलगाव, पारडगाव, खामतळोधी, सोनेगाव, सावलगाव, बोडधा, मुडझा, बल्लारपूर, भूज, धामणगाव, रणमोचन, तुलानमेंढा, मौशी, बाळापूर, मेंडकी, नवेगाव (मेंडकी), कुडेसावली, हळदा, पद्मापूर, बेटाळा, बरडकिन्ही, नांदगाव येथील शेतकरी उपस्थित होते.