एसटीच्या २० टक्के भाडेवाढीविरुद्ध निदर्शने
By Admin | Updated: November 13, 2015 01:11 IST2015-11-13T01:11:30+5:302015-11-13T01:11:30+5:30
ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटीच्या भाड्यात २० टक्के वाढ केली. ही वाढ गरीबांचे शोषण करणारी असून याविरुद्ध ...

एसटीच्या २० टक्के भाडेवाढीविरुद्ध निदर्शने
काँग्रेसचे आंदोलन : जिल्हाधिकारी व आगार व्यवस्थापकांना निवेदन
चंद्रपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटीच्या भाड्यात २० टक्के वाढ केली. ही वाढ गरीबांचे शोषण करणारी असून याविरुद्ध चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसटी महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. ही भाडेवाढ रद्द करण्यात यावी यासाठी निवेदनही देण्यात आले.
राज्यात भाजप-शिवसेना सत्ता स्थापनेनंतर सर्वत्र महागाईने पाय पसरले आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एस.टी.मध्ये २० टक्के भाडेवाढ केली. दुष्काळच्या छायेत असलेल्या राज्यात एस.टी. ची भाडेवाढ झाल्याने गरीबांच्या मुळावरच हे सरकार उठले की काय? असा प्रश्न कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
ही भाडेवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि चंद्रपूर आगारापुढे निदर्शने करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय हिवरे आणि आगार व्यवस्थापक घागरगुंडे यांना निवेदन देऊन भाडेवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्त्व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तथा काँग्रेसचे शहर सचिव महेश मेंढे यांनी केले. यावेळी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोखारे, मनपा स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामू तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर पंचायत समिती माजी सभापती राजेश पचारे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन कत्याल, कुणाल चहारे, घुग्घुसच्या सरपंच पुष्पा मेश्राम, प्रकाश बोबडे, पवन अगदारी, नागेश बोंडे, जावेद कुरेशी, गुड्डू सिंग, प्रभाकर ताजने, चंदू माने, गणेश आवारी, हेमराज जुनघरे, पवन चनकापूरे, आकाश जुनघरे, देवराव भोयर, दिनेश मेश्राम, अनिल बावणे, चंदनसिंह, भारत चव्हाण, देवराव भोयर, शंकर काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)