वाहनाला धक्का देत केला इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:13+5:302021-01-13T05:12:13+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा फोटो : धक्का मारो आंदोेलनात नितीन भटारकर व राष्ट्रवादी युवक ...

वाहनाला धक्का देत केला इंधन दरवाढीचा निषेध
राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
फोटो : धक्का मारो आंदोेलनात नितीन भटारकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते.
चंद्रपूर : देशात उच्चांक गाठलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात चारचाकी वाहनाला दोराने बांधून धक्का मारो आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोलवर ५० टक्के कर व डिझेलवर ४० टक्के कर लावला आहे. त्यामुळे आजपर्यंतचा इंधन दरवाढीचा उच्चांक आहे. कोरोनामुळे महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना दररोज दरवाढीचा दणका बसत आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल-डिझेलवर कर आकारला जात नसल्यामुळे तिथे पेट्रोल, डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात शहराध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, रा.यु.काँ. शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, माजी सरपंच अमोल ठाकरे, नितीन पिपळशेंडे, पंकज ढेंगारे, प्रदेश सचिव गणेश गिरधर, अभिनव देशपांडे, संजय ठाकूर, अब्दुल एजाज, नौशादभाई सिद्दीकी, विकास विरुटकर, मानव वाघमारे, सुनील गजलवार, सतीश मुरार, कृष्णा झाडे, कुणाल ढेंगारे, साहिल आगलावे, केतन जोरगेवार, नदीम शेख, समीर शेख, कोमिल मडावी, आदित्य ठेंगणे, विशाल इसनकर, विशाल पासवान, विपीन लभाणे, शुभम बाराहाते, अतुल तायडे, कार्तिक निकोडे, रूपेश कोंडावार, पवन बंडीवार, संजय रामटेके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.