‘बेशरम’च्या फुलांचा हार पाठवून दरेकरांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST2021-09-16T04:34:33+5:302021-09-16T04:34:33+5:30

चंद्रपूर : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा चंद्रपूर ...

Protesting Darekar's statement by sending a garland of 'Besharam' flowers | ‘बेशरम’च्या फुलांचा हार पाठवून दरेकरांच्या वक्तव्याचा निषेध

‘बेशरम’च्या फुलांचा हार पाठवून दरेकरांच्या वक्तव्याचा निषेध

चंद्रपूर : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने त्यांना पोस्टाने ‘बेशरम’च्या फुलांचा हार पाठवून निषेध करण्यात आला.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना ‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असे वाद्गस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध म्हणून बुधवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने ‘बेशरम’च्या फुलांचा हार पोस्टाने पाठवून निषेध केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर माफी मागावी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करून राजीनामा घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी चंद्रपूर युवती शहर अध्यक्ष वैष्णवी देवतळे, युवती कार्यध्यक्ष अश्विनी तल्लापल्लीवार, स्वाती दुर्गंमवार, वर्षा बामनवाडे, खुशी जैसाभाती आदी उपस्थित होते.

Web Title: Protesting Darekar's statement by sending a garland of 'Besharam' flowers