पत्रकारांनी घेतला निषेधाचा ठराव
By Admin | Updated: December 22, 2015 01:15 IST2015-12-22T01:15:07+5:302015-12-22T01:15:07+5:30
राजुरा तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून वृत्तसंकलन करणाऱ्यांवर माफियाकडून दबाव आणल्या जात आह.

पत्रकारांनी घेतला निषेधाचा ठराव
राजुरा : राजुरा तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून वृत्तसंकलन करणाऱ्यांवर माफियाकडून दबाव आणल्या जात आह. मारहाण केल्या जात आहे. राजुरा शहरात मागील काही काळात पत्रकार अनिल बाळ सराफ यांच्यावर जीवघेणा हमला झाला. नागपुरातील एका प्रादेशिक दैनिकाचे स्थानिक पत्रकार बादल बेले यांना जबर मारहाण झाली. तसेच सुरेश साळवे यांच्यावर रेती माफियांनी हमला करण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’चे शहर प्रतिनिधी प्रा.बी.यू. बोर्डेवार यांच्याविरुद्ध महिलांना चिथावून पोलिसांत खोटी तक्रार केली. भविष्यातसुद्धा असे प्रकार राजुरा शहरात होऊ शकतात. यामुळे याची पत्रकार संघाने गंभीर दखल घेत ५० पत्रकारांनी निषेध ठराव नोंदवून परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधीक्षक सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक प्रमोद डोंगरे यांना निवेदन दिले.
याप्रसंगी दोन्ही पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद भेंडे, मसुद अहमद, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.उमाकांत धोटे, ज्येष्ठ पत्रकार मोहन शर्मा, विनायक देशमुख, महीयर गुंडेविया, अनिल बाळ सराफ, प्रा.बी.यू. बोर्डेवार, बादल बेले, प्रवीण देशकर, सुरेश साळवे, गणेश बेले, सादिक काझी, एजाज अहमद, आनंद चलाख, बाबा बेग, एम.के. शेलोटे, मंगेश बोरकुटे, क्रिष्णकुमार पोचम, रंगराम कुळसंगे, श्रीकृष्ण गोरे, वामन पुरटकर, प्रा.सय्यद जाकीर, मंगेश श्रीराम, प्रवीण मेकर्तीवार, अजय आरमुलवार, जितेंद्र दुबे, अजय येलकापल्ली, जमीर शेख, अविनाश दोरखंडे, विजय चन्ने, बंडू वनकर, प्रा.राजेंद्र मोरे, उमेश मारशेट्टीवार, रूपेश चिडे, अमित जयपूरकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बसच्या धडकेत एक ठार
बल्लारपूर : एसटी बस मागे घेत असताना, बसची जबर धडक बसल्याने एक इसम जागीच ठार झाल्याची घटना येथील बस स्थानकावर शनिवारी दुपारी घडली.
मृत इसमाची ओळख पटली नाही. मृताचे वय अंदाजे ७० वर्ष आहे. एम.एच.एच. ८०२८ या ही भामरागड-चंद्रपूर ही बस बल्लारपूर बसस्थानकावर येऊन ती परत जात असताना हा अपघात बस स्थानकाचे आवारातच घडला. (तालुका प्रतिनिधी)
पत्रकारांना संरक्षण देऊ - नायक
४राजुरा तालुक्यातील पत्रकारांवर कुणीही हल्ल्याचा बेत रचत असेल तर त्याला मी सोडणार नाही, तुम्ही मला माहिती द्या मी कडक कारवाई करीन, अशी ग्वाही विश्रामगृहात सर्व पत्रकारांना परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक प्रमोद डोंगरे यांनी दिली.