आर्वी येथे लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:23+5:302021-03-22T04:25:23+5:30

आर्वी गावाला आदर्श गाव घडवण्यासाठी संपूर्ण नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, गावात लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत बांधकाम, रस्त्याच्या ...

Protection wall of the school through public participation at Arvi | आर्वी येथे लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत

आर्वी येथे लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत

आर्वी गावाला आदर्श गाव घडवण्यासाठी संपूर्ण नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, गावात लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत बांधकाम, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे, पांदन रस्ते स्वच्छ करणे, महिलांच्या सबलीकरणासाठी मार्गदर्शन मेळावा घेणे, शेती संबंधी मार्गदर्शन शिबिर राबविणे यासह अन्य उपक्रम सरपंच महासंघ अंतर्गत सुरु आहे.

गावातील नागरिकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा उचललेला असून दररोज सकाळी गावातील रस्ते झाडून स्वच्छ करीत आहे. यात मोठ्याप्रमाणात गावातील युवक, युवती, महिला व पुरुष सहभागी होत असून गावच्या सरपंच शालू लांडे, उपसरपंच सुभाष काटवले, ग्रामसेवक जयश्री चंदनखेडे, सदस्य

वंदना मुसळे, सुवर्णा महाकुलकर, सुरेखा रामटेके, उषा उपरे, तानेबाई कोहपरे, मारोती महाकुलकर, भास्कर डोंगे, बंडू आईलवार यासह संपूर्ण आर्वीवासीय सहकार्य करीत आहे.

Web Title: Protection wall of the school through public participation at Arvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.