१४४ कोटींचा वार्षिक आराखडा लघुगटाकडून प्रस्तावित

By Admin | Updated: September 29, 2015 02:29 IST2015-09-29T02:29:28+5:302015-09-29T02:29:28+5:30

जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ वर्षीसाठी १४४ कोटी ४३ लाख रूपयांचा आराखडा सोमवारी लघुगटाकडून प्रस्तावित

The proposed plan of 144 crores is proposed by the sub-group | १४४ कोटींचा वार्षिक आराखडा लघुगटाकडून प्रस्तावित

१४४ कोटींचा वार्षिक आराखडा लघुगटाकडून प्रस्तावित

चंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ वर्षीसाठी १४४ कोटी ४३ लाख रूपयांचा आराखडा सोमवारी लघुगटाकडून प्रस्तावित करण्यात आला. या सोबतच अनुसूचित जाती उपयोजना ६३ कोटी २९ लाख ९२ हजार व आदिवासी उपयोजना १३४ कोटी ८०३ लाख ३३ हजाराचा आराखडाही या बैठकीत प्रस्तावित करण्यात आला.
आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सदस्य अंजली घोटेकर, ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सुरेश वानखेडे व सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ साठी शासनाने १४४ कोटी ४३ लाखाची मर्यादा आखून दिली होती. तर यंत्रणांची मागणी ३३२ कोटी ७६ लाख २६ हजारांची केली होती. अंमलबजावणी यंत्रणांची १८७ कोटी ५६ लाखांची अतिरिक्त मागणी होती. यात कृषी व सलग्न सेवा, ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग, परिवहन, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा, जिल्हा नाविन्यता परिषद व इतर योजनांचा समावेश आहे.
कृषी विभागाने विशेष कृषी विकास आराखडा तयार करण्यासाठी वेगळ्याने निधीची मागणी करावी, तो देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्याच बरोबर कॅपिटल इंव्हेंस्टमेंटचाही आराखडा तयार करावा. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ते व ग्रामीण रस्त्याचा एकत्रित आराखडा तयार करण्याच्या सुचना करून २०१५-१६ चा खर्च तत्काळ करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The proposed plan of 144 crores is proposed by the sub-group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.