प्रकाश देवतळे, नंदू नगरकर यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:53 IST2017-08-19T23:53:12+5:302017-08-19T23:53:47+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

Proposal for the expulsion of Prakash Devaltale, Nandu Nagarkar | प्रकाश देवतळे, नंदू नगरकर यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव

प्रकाश देवतळे, नंदू नगरकर यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव

ठळक मुद्देपुगलिया समर्थकांचा मंथन मेळावा : कार्यकर्त्यांनी मांडला ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटाचे समाधान झाले नाही. त्यामुळे ऐतिहासिक काँग्रेसचे ध्वजारोहण तहसीलदारांनी केले. या वादाचे पर्यवसान शनिवारी आयोजित पुगलिया समर्थकांच्या मंथन मेळाव्यात उमटले. कार्यकर्त्यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव पारित केला. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली येथील राजीव गांधी सभागृहात विचार मंथन मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस, विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, काँग्रेस सेवादल, महिला आघाडी, युवक काँग्रेस व इंटक संघटनेने केले होते. मेळाव्याला जिल्हाभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला व्यासपीठावर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक प्रशांत दानव, अशोक नागापुरे, युवा नेते राहूल पुगलिया, जि.प. सदस्य शिवचंद काळे, विनोद अहिरकर, देवेंद्र बेले, मन्ना द्विवेदी, प्रवीण पडवेकर, चंद्रशेखर पोडे, माजी जि.प. सदस्य वैशाली पुल्लावार, वसंत मांढरे, तारासिंग कलशी, माजी जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, सर्व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष नंदू नागरकर यांचे निष्कासन करण्यात यावे म्हणून साईनाथ बुच्चे यांनी तर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांना निष्कासित करण्याचा प्रस्ताव वसंत मांढरे यांनी मांडला. दोन्ही पदाधिकाºयांना निष्कासीत करण्यासाठी उपस्थितांनी हात उंचावून प्रस्ताव पारित केला. संचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. अविनाश ठावरी यांनी केले. काँग्रेसच्या दुसºया गटाची बैठक तुकूम येथे पार पडली. या बैठकीलाही कार्यकर्त्याची हजेरी होती.
शेतकºयांसाठी आंदोलन करणार - पुगलिया
शेतकरी वर्ग दुष्काळाशी संघर्ष करीत आहे. शासनाने कर्जमाफी केली. परंतु, निकष सुरळीत नसल्यामुळे शेतकºयांत नाराजी आहे. शेतकºयांना न्याय हक्क मिळाला पाहिजे. मात्र राज्य सरकारचे धोरण शेतकºयांना हक्कापासून वंचित ठेवण्याचे आहे. काँग्रेस पक्ष शेतकºयांच्या पाठीशी असून शेतीच्या खरीप हंगाम आटोपताच हक्क प्राप्तीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिला.
आयात कार्यकर्त्यांना काँग्रेसचे पद नको
काँग्रेस पक्षाला धर्मनिरपेक्षतेची वर्षापार परंपरा आहे. यासाठी अनेक जुन्या, कर्मठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अन्य पक्षातून आलेल्यांना पक्षातील महत्त्वाचे व संघटनात्मक बांधणीचे पद दिल्याने पक्षाला मजबुती येत नाही. परिणामी प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होवू नये, म्हणून आयात कार्यकर्त्यांना महत्त्वाचे पद देण्यात येवू नये, अशी भूमिका असल्याचे नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

Web Title: Proposal for the expulsion of Prakash Devaltale, Nandu Nagarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.