अवैध रेतीसह अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:16+5:302021-04-15T04:27:16+5:30
सिंदेवाही पोलिसांची कारवाई सिंदेवाही : गस्तीदरम्यान आठ हायवा टिप्पर गाड्यांमधून अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. ...

अवैध रेतीसह अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
सिंदेवाही पोलिसांची कारवाई
सिंदेवाही : गस्तीदरम्यान आठ हायवा टिप्पर गाड्यांमधून अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून सिंदेवाही पोलिसांनी तत्काळ किन्ही फाटा या ठिकाणी आठही हायवा ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ओव्हरलोड रेती वाहतूक करीत असल्याचे दिसून आले.
अवैध रेतीसह सर्व वाहने असा एकूण दोन कोटी ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तहसीलदार सिंदेवाही यांना तसेच आरटीओ यांना पुढील कार्यवाही करण्याकरिता लेखी अहवाल पाठवण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे मौजा तांबेगडी मेंढा या ठिकाणी नदी मार्गातून अवैध रेती चोरी करीत असलेला हिरज विश्वनाथ सुरपाम (३५, रा. पाथरी) याला व रेतीने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली एकूण किंमत रुपये पाच लाख पाच हजार रुपये जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहे.