समाजाच्या विकासासाठी परिचय मेळावे योग्य व्यासपीठ
By Admin | Updated: January 15, 2016 01:44 IST2016-01-15T01:44:43+5:302016-01-15T01:44:43+5:30
सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी परिचय मेळाव्यासारखे उपक्रम आवश्यक असून या माध्यमातून समाज एकत्र घेऊन समाजाचा विकास होण्यास मदत होते.

समाजाच्या विकासासाठी परिचय मेळावे योग्य व्यासपीठ
शांताराम पोटदुखे : तेली समाज उपवर- वधू परिचय मेळावा
चंद्रपूर : सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी परिचय मेळाव्यासारखे उपक्रम आवश्यक असून या माध्यमातून समाज एकत्र घेऊन समाजाचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे परिचय मेळावे समाजाच्या विकासासाठी चांगले व्यासपीठ ठरत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले. तेली युवक मंडळ चंद्रपूरच्या वतीने मातोश्री सभागृह तुकूम येथे आयोजित उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवराव बालपांडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे, मेडिकल कॉलेजचे अधिव्याख्याता डॉ. चारुहास आखरे, डॉ. चेतन उराडे, सुनील बन्सोड, शोभा पोटदुखे, प्रा. वासुदेव रागीट, माजी नगरसेवक रावजीे चवरे, बबनराव फंड, नरेंद्र बुरांडे, राजेंद्र आखरे, शंंकर उराडे, चंद्रशेखर घटे, अनिल खनके, महेश बारई, पाडूरंग चन्ने, सुमन उमाटे, नगरसेवक आकाश साखरकर, योगेश समरित, देवेंद्र बेले, मनोहर बेले, रमेश भुते, प्रा. मधूकर रागीट, रेखा वैरागडे, राजू रघाताटे, प्रमोद हजारे, शैलेश जुमडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलताना पोटदुखे म्हणाले, उपवर- वधूंचे लग्न जुळविताना कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागते. वेळ, पैसा खर्च होतो. परंतु परिचय मेळाव्यापासून उपवर- वधू त्यांच्या पसंतीचे ठिकाण एकाच ठिकाणी बघायला मिळते. शिवाय संपूर्ण समाजबांधव एकत्र येत असल्याने त्यांच्यात एकीचे बळ दिसून येते. त्यामुळे असे उपक्रम वारंवार व्हावेत, असे ते म्हणाले.
यावेळी अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान कार्यक्रमात समाजातील उपवर- वधूंची माहिती असलेल्या ‘प्रेरणा-१६’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मेळाव्यात २०० हून अधिक उपवर- वधूंनी परिचय दिला. कार्यक्रमात मुख्याध्यापक शंकर उराडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बंडू बिजवे यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)