खावटी अनुदान तातडीने जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST2021-05-12T04:28:48+5:302021-05-12T04:28:48+5:30

सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा प्रकोप आता ग्रामीण भागातही पसरू लागला असून आदिवासी गुड्यांवर याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. ...

Promptly collect the khawti grant | खावटी अनुदान तातडीने जमा करा

खावटी अनुदान तातडीने जमा करा

सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा प्रकोप आता ग्रामीण भागातही पसरू लागला असून आदिवासी गुड्यांवर याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्य शासनाने लावलेल्या लाॅकडाऊनचा जबर फटका जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी वस्त्यांना बसला आहे. कामधंद्यानिमित्त गावातून बाहेर पडणाऱ्या आदिवासी बांधवांना आपल्या गावातच बंदिस्त होऊन बसावे लागले असल्याने त्यांचा रोजगार बुडालेला आहे. माणिकगड पहाडावरील कोलाम व जिल्ह्यातील अन्य भागातील ही आदिवासी बांधवांकडून रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आदिम कोलाम व अन्य आदिवासी कुटुंबांनी मोठा फटका सहन करावा लागला. सध्याच्या कोरोना प्रभावाने आदिवासी कुटुंब भयभीत झालेले असून, त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने समोर येण्याची गरज आहे. अशा कुटुंबांची तातडीने मदत करता यावी यासाठी राज्य शासनाने खावटी अनुदानाच्या राशीची घोषणा केलेली आहे. मात्र ही राशी अद्यापही आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेली नसल्याने आदिवासी कुटुंब हवालदिल झालेले आहेत. जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या हेतूने अप्पर आयुक्त नागपूर, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग चंद्रपूर व आदिवासी विकास महामंडळ यांना आदेश निर्गमित करावेत अशी मागणी माजी आमदार ॲड. चटप व कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष कुंभारे यांनी केली आहे.

Web Title: Promptly collect the khawti grant