खादी ग्रामोद्योगातून रोजगाराला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:24+5:30
एमएसएमईच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, हीच खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

खादी ग्रामोद्योगातून रोजगाराला चालना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे हे वर्ष आहे. आज सर्वच राजकीय पक्षांच्या भाषणात बेरोजगारी हा मुद्दा असतो. हजारो लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणारा खादी ग्रामोद्योग हा उपक्रम आहे. हा उपक्रम गांधीजींच्या स्वप्नातला उपक्रम आहे. मी मंत्री असताना माझ्या मंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी दर मंगळवारी खादी परिधान करत होते. एमएसएमईच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, हीच खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शुक्रवारी मूल येथे नाग विदर्भ चरखा संघाच्या खादी ग्राहक मेळाव्यात बोलत होते.
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, बाबुराव सोनुलवार, बंडूजी भडके, हेमराज कुंभारे, दादाजी बनकर, राजू गुरनुले, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर, संजय पाटील मारकवार आदींची उपस्थिती होती. आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आठवडयातुन दोन दिवस खादी परिधान केले तर सुमारे ३ हजार कोटींचा व्यवसाय होईल. यादृष्टीने खादी व ग्रामोद्योगाकडे बघण्याची आवश्यकता आहे. मेळाव्याला नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.