शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अंबुजासमोर प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:09 PM

अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा सोमवारी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण होतपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांसह देशमुख यांना ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा सोमवारी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण होतपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांसह देशमुख यांना ताब्यात घेतले.सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत महसूल विभागाच्या सचिवांकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. वेळ आल्यास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त व जन विकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला. प्रकल्पग्रस्तांसोबत जन विकासच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर सुध्दा पोलीसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केली. आंदोलनकर्ते जखमी झाल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.कंपनीने विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दरानुसार जमिनीचा मोबदला दिला. तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकºया पण दिल्या. १७ -१८ वर्षांतर प्रकल्पग्रस्त विनाकारण गैरकायदेशिररित्या आंदोलन करून कंपनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.-संजीव राव, कर्मशिअल हेड, मराठा सिमेंट वर्क्स,