राहुल गांधींच्या अटकेचा निषेध
By Admin | Updated: November 4, 2016 01:22 IST2016-11-04T01:22:21+5:302016-11-04T01:22:21+5:30
चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी २ वाजता जटपुरा गेट महात्मा गांधी

राहुल गांधींच्या अटकेचा निषेध
शहर काँग्रेसचे आयोजन : आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकाला श्रद्धांजली
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी २ वाजता जटपुरा गेट महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. तसेच ‘वन रँक वन पेन्शन’ या मागणीकरिता माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी रामकिसन ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना मज्जाव करून अटक करण्यात आली. त्याबाबत चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमेटीच्या वतीने जटपुरा गेट येथे निषेध करण्यात आला. मोदी सरकार विरूद्द निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
सदर सभा ही चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे अध्यक्ष नंदु नागरकर यांचे अध्यक्षतेखाली झाली. सदर सभेत माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, माजी महाराष्ट्र प्रदेश सुनिता लोढीया, अॅड. विजय मोगरे, महिला जिल्हा अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, वंदना भागवत, महेश मेंढे, मोहन डोंगरे, चंद्रकांत गोहोकर, डॉ. विजय देवतळे, अॅड. शाकीर मलक, असंघटीत कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
युवक काँग्रेसची निदर्शने
चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन कत्याल यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. तसेच आपल्या हक्कासाठी आत्महत्या करणारे वयोवृद्ध माजी सैनिक रामकिशन गे्रवाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रजनी हजारे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर मनपाचे सभापती संतोष लहामगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.