कंत्राटी कामगारांवरील अन्यायाचा निषेध
By Admin | Updated: May 17, 2017 00:36 IST2017-05-17T00:36:01+5:302017-05-17T00:36:01+5:30
जिल्हयातील कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत कंत्राटी कामगारांना सोई-सुविधांपासून वंचित ठेवण्यात येते.

कंत्राटी कामगारांवरील अन्यायाचा निषेध
जिल्हाधिकारी कार्यालय : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपोषण प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हयातील कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत कंत्राटी कामगारांना सोई-सुविधांपासून वंचित ठेवण्यात येते. त्यांना सर्व कायदेशीर सोई-सुविधा लागू कराव्यात, अशी मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत साखळी उपोषण मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. यावेळी जिÞलाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यापूर्वीही कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषधार्थ जिÞल्हाधिकारी कार्यालय समोर २१ मार्च रोजी धरणे देण्यात आले होते. अभिनव कन्स्ट्रक्शन कंपनीतील निर्दोष ११ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले. जेव्हा कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ५ मार्च रोजी अधिकार्यांना पत्र लिहून अन्यायग्रस्त कामगारांना पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधन्याकरिता मंगळवारपासून जिÞलाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये चार कामगारांंनी उपोषण केले. रायुकाँचे जिÞल्हाध्यक्ष नितीन भटारकर व कामगार नेते सय्यद अनवर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. त्यात सुनील दहेगावकर, सिन्नू गोस्कुल्ला, फय्याज शेख, अमोल ठाकरे, संजय ठाकूर, सुजीत उपरे, प्रफुल्ल कुचनकर, आशिष कार्लेकर, रोशन कोमरेड्डीवर, मुन्ना नर्वदे, विवेकानंद कटारें, नंदजी यादव, दयानंद यादव, विजय महंतो, अनुराग चटप, बशीर शेख, समय्या पिल्ली, रमरूप कैथल, सिंहल नगराळे, स्वप्निल शिंदे, अशोक वर्मा आदी सहभागी होते.