लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात निषेध आंदोलन करण्यात आले.अमरावती येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात शुभम शेलकर या विद्यार्थ्यांने महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क व मोफत उच्च शिक्षण देण्याबाबत प्रश्न केला. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुवत नसेल तर शिक्षण सोडून काम-धंदा करा, असा उपरोधिक सल्ला दिला. तसेच या प्रकरणाचे चित्रीकरण करणाऱ्या एका विद्यार्थ्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. या घटनेचा निषेध करीत शिक्षणमंत्र्यांना तात्काळ पदमुक्त करावे, अशी मागणी केली.यावेळी प्रतिक डोर्लीकर, सुलभ प्रवीण खोबरागडे, राजस खोब्रागडे, संघपाल सरकाटे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसंगी रंजीता गजरे, श्रावस्ती तावाडे, प्रतिक मेश्राम, मोनू देव, नयन अलोणे, सक्षम पथरडे, कपिल गणवीर, यश उमरे, वृषाली मासारकर, अमोल शेंडे, सुमित हस्ते उपस्थित होते.
शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:00 IST
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात निषेध आंदोलन करण्यात आले.
शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध
ठळक मुद्देरिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशन : शिक्षणमंत्र्यांना पदमुक्त करण्याची मागणी