इंटकच्या अधिवेशनात केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध
By Admin | Updated: February 3, 2015 22:52 IST2015-02-03T22:52:52+5:302015-02-03T22:52:52+5:30
राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या (इंटक) महाधिवेशनात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. कंत्राटी कामगारांंचे शोषण, कोल इंडियाच्या भागिदारीनंतर

इंटकच्या अधिवेशनात केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध
चंद्रपूर : राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या (इंटक) महाधिवेशनात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. कंत्राटी कामगारांंचे शोषण, कोल इंडियाच्या भागिदारीनंतर कामगार कायद्यात झालेले बदल याविषय या अधिवेशनात ठराव घेण्यात आले.
स्थानिक दुर्गापूर वसाहतीमधील सद्भावना सभागृहात एक दिवसीय महाअधिवेशन पार पडले. अध्यक्षस्थानी आर. के. चिब होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील वेकोलिच्या सर्व क्षेत्रातील निवडक २०० प्रतिनिधींनी यात भाग घेतला. संघटनेचे वरीष्ठ नेते माजी आमदार एस. क्यू. झामा, पेंच-कन्हान क्षेत्राचे कामगार नेते आमदार सोहन वाल्मिकी, नागपूर-वर्धा क्षेत्राचे कामगार नेते के.के. सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ कामगार नेते यावेळी मंचावर उपस्थित होते. कामगार नेते एस. क्यू झामा, सोहन वाल्मिीकी, कामगार नेते के.के.सिंग आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना वक्त्यांनी सध्यापरीस्थितीवर चिंता व्यक्त केली. वेकोलिचे उत्पादन ४५ मिलियन टनावरून ३९ मिलियन टनावर घसरले. नवे व्यवस्थापकीय संचालक मिश्रा यांनी संघटनांसोबत चर्चा करुन वकोलिचे उत्पानद वाढविण्यासाठी नियोजन केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अधिवेशनादरम्यान कामगारांची रॅली काढण्यात आली. यात ३५० दुचाकी आणि २०० वर चारचाकी वाहने सहभागी झाली होती. रॅलीच्या समारोपप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. ते म्हणाले, कामगारांची आणि त्यांच्या संघटेनेची मोठी शक्ती आहे. मात्र या शक्तीचा उपयोग विकासाठी व्हायला हवा. यापुढे आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले. या अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात संघटनेची केंद्रीय कार्यकारिणी आणि नागपूर-वर्धा क्षेत्राची कार्यकारिणी आणि पाथरखेडा क्षेत्राच्या कार्यकारिणीच्या निवडणुका पार पडल्या. यात राधेश्याम सिंग अध्यक्ष तर, एस.क्यू. जामा यांची महामंत्री पदी निवड करण्यात आली. वरिष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चा करून कार्यकारिणी गठित करण्याचा अधिकार यावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.
नागपूर-वर्धा क्षेत्रासाठी के. के. सिंग यांची तर, पेंच कन्हान क्षेत्रासाठी सोहन वाल्मिीकी, पाथरखेडा क्षेत्रासाठी आर.के. चिंब आणि दामोदर मिश्रा यांची निवड करण्यात आली. या सर्वांना कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले. के.के. सिंग यांच्या संयोजनाखाली हे महाअधिवेशन पार पडले. संचालन जिया उल हक यांनी तर आभार विजय टेनपे यांनी मानले. अधिवेशनात मोठ्या संख्येने कामगार वर्ग सहभागी झाला होता. (जिल्हा प्रतिनिधी)