तंत्रज्ञानाच्या वापरातूनच प्रगती

By Admin | Updated: May 30, 2017 00:37 IST2017-05-30T00:37:48+5:302017-05-30T00:37:48+5:30

कृषी पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी राजुरा तालुक्यातील शेती उत्तम आहे.

Progress through the use of technology | तंत्रज्ञानाच्या वापरातूनच प्रगती

तंत्रज्ञानाच्या वापरातूनच प्रगती

संजय धोटे : शेतकरी शिवार संवाद, योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : कृषी पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी राजुरा तालुक्यातील शेती उत्तम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी, त्यातूनच शेतकऱ्याची प्रगती आहे. असे प्रतिपादन आमदार धोटे यांनी केले.
आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी राजुरा तालुक्यातील साखरवाही येथील ग्रामपंचायतचे परिसरात या भागातील शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी साखरवाही येथील देवराव परसुटकर व रूषी करमणकर यांचे शेतातील शेत शिवारातील बांध्यावर प्रत्यक्ष जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेततळे, नाला खोलीकरण, बोडी तसेच जलयुक्त शिवारच्या कामाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यास समृद्ध, उन्नत, विकसीत अद्यावत शाश्वत शेती करणे, हे आपले मिशन असावे. असे ते म्हणाले.
राजुरा तालुक्याला कृषी पर्यटन क्षेत्रात सिंचनाचे उपलब्ध स्थळे निर्माण करून या क्षेत्राचा विकास करण्यात येणाऱ्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले. त्यामुळे शासनाच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या धोरणाचा पुरस्कार करत आगामी विकासीत शेतीकरीता नियोजन करण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रांनी परस्परांशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी, विजेची व वीज पंपाची उपलब्धता, मागेल त्याला विहिर आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर द्यावा. तसेच शेतीसाठी पुरक जोडधंदा उभा करून शेती विकासीत करा, असे आवाहन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी शिवार संवाद यात्रा प्रसंगी बोलताना सांगितले.
या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी निगडीत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही. त्यामुळे नविन तंत्रज्ञान अद्यावत करून नियोजन करताना दुध संकलन केंद्र, इतर लघु उद्योग, बि-बियाणे रासायनिक खते, कर्जाचे पूनर्गठन, कर्जाची परतफेड, किसान क्रेडीट कार्ड वाटप, राज्य व केंद्राच्या विविध योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, पशुधनाकरिता चारा नियोजन आदी सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देऊन त्यांचा जीवन परिवर्तन करण्यासाठी आपली सेवा वापरावी असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या सह भाजपा युवा मोर्चा तालुका महामंत्री दिलीप गिरसावळ, सरपंच कल्पना कोल्हे, उपसरपंच बंडू बोरकुटे, तालुका कृषी अधिकारी आडे, तालुका कृषी सहा. अधिकारी चव्हाण, तालुका कृषी सहायक अधिकारी गंधथळे, तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक, व तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध विषयांचा आढावा
राजुरा तालुक्यातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कृषी पर्यटन क्षेत्र विकसीत करण्याविषयी शेती पुरक बाबीचा, शेती विषयक जोडधंदे उभे करण्याविषयी, हंगामासाठी बियाण्याची उपलब्धता खते, तालुका कृषी केंद्राची तपासणी, गुणनियंत्रण, भरारी पथकाचे गठन, गोदामाची उपलब्धता, वीज पंपाची सध्यस्थिती, सिंचन, जलयुक्त शिवार आदी बाबीचा घटकवार आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रलंबित व सुरू असलेले कामे सुरू असलेल्या योजना, विद्युत मिटर, खते व बियाण्याची उपलब्धता व बँकेचे कर्ज तसेच नविन योजनाचा लाभ शेतकऱ्याना कसा देता येईल. लघु उद्योग निर्माण केल्याने काय होईल, शेतीचे उत्पन्न वाढण्यास कशी मदत होईल या आदी विषयावर उपस्थित मान्यवर सदस्यांची चर्चा केली.

Web Title: Progress through the use of technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.