जिल्ह्यात धानाचे उत्पादन घटणार
By Admin | Updated: September 13, 2015 00:53 IST2015-09-13T00:53:58+5:302015-09-13T00:53:58+5:30
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासून मंदगतीने पाऊस सुरू झाला.

जिल्ह्यात धानाचे उत्पादन घटणार
केवळ ७० टक्के रोवण्या : धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासून मंदगतीने पाऊस सुरू झाला. परिणामी जिल्ह्यात केवळ ७० टक्के रोवणी झाल्या आहे. मात्र रोवणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, ब्रह्मपुरी, चिमूर, गोंडपिपरी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेण्यात येते, तर वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना या तालुक्यातील काही शेतकरी धानाचे पिक घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. हंगामाच्या सुरूवातीला झालेल्या पावसात पऱ्हे टाकण्यात आले. त्यानंतरही दरमदार पाऊस झाला नाही. अधून-मधून आलेल्या पावसाच्या भरवशावर रोवणी करण्यात आली. पऱ्ह्याची वाढ झाल्याने रोवणी केल्यानंतर पऱ्ह्यातील ताकद दिवसागणिक कमी झाली. रोवणी झाल्यानंतर दमदार पाऊस अपेक्षीत असताना पाऊस झाला नाही. उष्णता मा$$$$$$त्र वाढत असल्याने रोवणी झालेल्या धान पिकाची वाढ झाली नाही. त्याला फांदेही फुटले नाहीत. त्याचा परिणाम धानाच्या उत्पादनावर होणार आहे. रोवणीचा हंगाम निघून गेला. जिल्ह्यात ७० टक्के रोवणी झाली. पाऊसच नसल्याने उर्वरित ३० टक्के रोवणी होण्याची शक्यता आता मावळली आहे. रोवणी झालेल्या धान पिकात पावसाअभावी वाढण्याची ताकद नसल्याने यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात धान पीक घटण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. (प्रतिनिधी)