शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एक एकरातील हळदीपासून अडीच लाखांचे उत्पादन

By admin | Updated: February 18, 2017 00:42 IST

येथील सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वत:च्या वडिलोपार्जित एक एकर शेतीत पारंपरिक शेती नाकारुन हळद पिकाची लागवड केली.

तरुण शेतकऱ्यांचा उपक्रम : हळद उकळण्याचे उपकरण स्वत:च केले तयारकोठारी : येथील सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वत:च्या वडिलोपार्जित एक एकर शेतीत पारंपरिक शेती नाकारुन हळद पिकाची लागवड केली. यात त्यांना अडीच लाखांचे विक्रमी उत्पादन झाले. यातून त्यांना शुद्ध दोन लाख रूपयांचा नफा मिळाला आहे. अशोक भास्करराव मोरे असे शेतकऱ्याचे नाव आहे. आधुनिक पद्धतीने शेती करुन आत्मनिर्भर होण्याचा महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला आहे.अशोक मोरे यांच्याकडे वडोलोपार्जीत चार एकर शेती आहे. बी.ए.पास असलेल्या अशोकने नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र त्याला यश आले नाही. केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तो नाकारला गेला. मात्र तो खचून न जाता आधुनिक शेती करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्याने शेतीचे आत्मा अंतर्गत प्रशिक्षण घेतले. कृषी सहाय्यक निब्रड, मंडळ कृषी अधिकारी वरभे व आत्माचे कृषी अधिकारी धानोरकर यांनी अशोकला हळदीचे पीक घेण्यासाठी मार्गदर्शन केले व अशोकने एक एकर शेतीवर हळीचे उत्पादन घेण्यासाठी तयारी केली. त्यात तो यशस्वी झाला. एक एकर शेतीसाठी त्याने ४० हजार रूपयााचा खर्च केला. त्यापासून अडीचलाखाचे उत्पादन घेत शुद्ध दोन लाखाचा नफा मिळविला. त्यासाठी त्याने स्वत:सह त्याची पत्नी मनिषा वडील व आईने कठोर मेहनत घेतली. पारंपारीक शेतीपेक्षा आधुनिक शेती करुन हळदीच्या पिकांपासून तो आत्मनिर्भर झाला. त्यांचा इतरही शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)६० हजारांचे उपकरण १२ हजारात तयारहळद उत्पादन घेतल्यानंतर त्यास उकळून बाजारात विकावे लागते. सदर उपकरणाची किंमत ६० हजार रुपये आहे. परंतु अशोकने नागपूर जवळील वायगाव येथे जावून हळद शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या उपकरणाची पाहणी केली. मात्र तयार उपकरणाच्या खरेदीसाठी पैसे नसल्याने त्याने उपकरण स्वत:च तयार करण्याची योजना आखली. त्यांनी स्थानिक साहित्य वापरुन १२ हजारात उपकरण तयार करुन त्यात हळद उकळतो आहे. अशोक मोरे ३० वर्षाच्या तरुण सुशिक्षित शेतकऱ्यांचा प्रयत्न तरुणांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. त्याची दखल कृषी अधिकाऱ्यांनी घेत त्यासाठी लागणारी सर्व माहिती व मदत करीत आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आधुनिक शेतीकडे गेले पाहिजे. कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध लोकोपयोगी शेती करुन स्वत:सह कुटुंबाला आर्थिक मजबूत केले पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाकडून माहिती घेवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक मोरे यांनी केले आहे.