अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कोरोनाबाबत सर्व शासकीय नियम पाळून नाट्य प्रयोग सादर करण्याचे आश्वासनावर महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्याविषयी मुख्यमंत्र्याना निवेदन दिले. शिष्टमंडळाशी विचारविनिमय करून रंगभूमी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर २०२१ रोजी उघडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी व विभागांना दिले आहेत. झाडीपट्टी रंगभूमीचे निर्माता, कलावंत, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वाहनचालक, पेंडाल व पार्श्वसूचकांचे पोट झाडीपट्टीच्या नाटकानांवर चालते. कोरोना काळात अनेकदा पोलीस ठाण्यातून नाट्य प्रयोगासाठी परवानगी नाकारण्यात येते, कधी पोलीस विभागातर्फे परवानगी मिळाल्यानंतरही नाटक सुरू असतानाच नाटक बंद करण्याचे आदेश दिल्या जाऊ शकतात. अशा वेळी नाट्यनिर्मात्यांवर भुर्दंड बसतो. कलावंतांना निराश होऊन परतावे लागते. रंगभूमीच्या भरवशावर येथील कलावंत जगतो. ही समस्या लक्षात घेऊन ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अध्यादेशात मुख्यमंत्र्यानी झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचा स्वतंत्र अध्यादेश जाहीर करावा, अशी मागणी युवा रंगकर्मी प्रा. पेंढारकर, प्रा. बारसागडे यांनी निवेदनातून केली आहे.
झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र अध्यादेश जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:30 IST