राज्यमार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात अडचणी
By Admin | Updated: June 13, 2015 01:30 IST2015-06-13T01:29:29+5:302015-06-13T01:30:53+5:30
चिमूर शहरातील राज्य मार्गावर सिमेंट काँक्रीट चौपदरीकरण, नाली बांधकाम व पॅचेस भरण्याचे काम सुरू आहे.

राज्यमार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात अडचणी
चिमूर : चिमूर शहरातील राज्य मार्गावर सिमेंट काँक्रीट चौपदरीकरण, नाली बांधकाम व पॅचेस भरण्याचे काम सुरू आहे. बसस्थानक परिसरातील फुटपाथ दुकानदारांनी नाली बांधकाम सुरू असतानाच अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत नालीवर अतीक्रमण केले. त्यामुळे बांधकामात अडचण निर्माण होत आहे. अतिक्रमण होत असताना अधिकाऱ्यांनी चुप्पी का साधली, असा नागरिकांचा सवाल आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सिमेंट काँक्रीट चौपदरीकरणावर खड्डे पडून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. आहे.
चिमूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. चौपदरीकरण, नाली बांधकाम, रस्त्याचे पॅचेस भरण्याचे काम, सहकारी भात गिरणी ते नेहरू शाळेपर्यंत एक किलोमिटरचे बांधकाम सुरू आहे. अनेक दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने फुटपाथ दुकानदाराचे नुकसान होत आहे. दुकानदारांनी नाली बांधकाम सुरू असताना नालीवर दुकानासाठी कब्जा केला आहे. बसस्थानक ते हुतात्मा स्मारक परिसरापर्यंत काम सुरू असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यादेखत बळजबरीने नालीवर अतिक्रमण करण्यात आले. मात्र त्याविरोधात अधिकाऱ्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. याउलट अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणधारकांची पाठराखण करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)