शेतकऱ्यांच्या समस्या वाढताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:41 IST2017-12-01T23:40:47+5:302017-12-01T23:41:26+5:30
नक्षलवादी चळवळ संपुष्टात आली पाहिजे. परंतु शेतकऱ्यांवर घोर अन्याय होत राहिला तर एक दिवस असा येईल की शेतकरी नक्षलवादी बनल्याशिवाय राहणार नाही.

शेतकऱ्यांच्या समस्या वाढताहेत
ठळक मुद्देबच्चू कडू : शेतकरी मेळावा
आॅनलाईन लोकमत
राजुरा : नक्षलवादी चळवळ संपुष्टात आली पाहिजे. परंतु शेतकऱ्यांवर घोर अन्याय होत राहिला तर एक दिवस असा येईल की शेतकरी नक्षलवादी बनल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्यांचे तत्काळ निराकरण केले पाहिजे, असे मत आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
राजुरा येथे किसान कृती समन्वय समितीतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे होते. याप्रसंगी रघुनाथ पाटील, प्रा. सुशिला मोराळे, किशोर ढमाले, गणेश जगताप उपस्थित होते.