शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

नांदगावातील शेतकºयांची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:48 PM

तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता.

ठळक मुद्देपोलीस व महसूल प्रशासनाची कारवाई : शेतीकडे जाण्यासाठी मिळाला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता. चार महिन्यांपासून तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी सोमवारी न्याय मिळवून दिला. चंद्रपूर शहर पोलीस व बल्लारपूर तहसील प्रशासनाने अंमलबजावणी करून जुन्या वादावर पडदा पाडला.महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २४७ अन्वये शेतकºयांच्या वहिवाटीचा रस्ता मोकळा झाल्याने शेतकºयांना ऐन हंगामात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामध्ये महिला शेतकरी कल्पना बुरडकर यांनी मालकीच्या सर्व्हे क्रमांक ४७१ व २२० शेत जमिनीतून जाण्यासाठी अन्य शेतकºयांना प्रतिबंध केला होता. यासाठी त्यांनी कनिष्ठ न्यायालयाचे दार ठोठावले होते. तहसील प्रशासनानसह उपविभागीय अधिकारी यांच्यासह तब्बल १५ शेतकºयांना वेठीस धरले होते. यामुळे शेती हंगामात अन्य कामासाठी ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली. यामुळे शेतकºयांत तीव्र नाराजी होती. शेतातील उत्पादित मालाची नासाडी होण्याच्या मार्गावर आली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार त ेजिल्हाधिकारी असा प्रवास येथील शेतकºयांंना करावा लागला. परिणामी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी नांदगाव (पोडे) येथील शेतकरी राजकुमार कार्लेकर, शामराव देठे, नरेंद्र मोहितकर, दिलीप देठे, बंडू आमने, चंद्रशेखर आमने, शालीक शेंडे, दादाजी उरकुडे, महादेव उरकुडे, परशुराम जमदाडे, नानाजी गोहणे, शंकर पिंपळकर, नामदेव गोहोकार, सुभाष धोटे, विठ्ठल आमने आदी शेतकºयांची व्यथा लक्षात घेवून १८ आॅक्टोबर रोजी शेतकºयांना वहीवाटीचा रस्ता मोकळा करण्याचा आदेश दिला. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस आणि बल्लापूर तहसील प्रशासनाच्या वतीने संयुक्त कार्यवाही करून वादग्रस्त रस्ता मोकळा करण्यात आला. आता शेतीकडे सहजपणे जाता येणार आहे. शेतकºयांच्या वहिवाटीच्या रस्ता करुन देण्याची कारवाई नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, मंडळ अधिकारी तलाठी व चंद्रपूर पोलीस ठाण्याचे चिंचोलकर यांनी पोलीस ताफ्यासह केली.