नागपूर मार्गावर खासगी बस उलटली
By Admin | Updated: August 8, 2015 01:03 IST2015-08-08T01:03:46+5:302015-08-08T01:03:46+5:30
नागपूरहून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने येणारी गणराज ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस रस्ता दुभाजकाला धडकल्याने ...

नागपूर मार्गावर खासगी बस उलटली
सर्व सुखरूप : सुदैवाने प्राणहानी टळली
भद्रावती: नागपूरहून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने येणारी गणराज ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस रस्ता दुभाजकाला धडकल्याने रस्त्याच्या मधोमध प्रवाशांसह उलटली. या बसमध्ये २५ प्रवासी होते. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील टाकळी गावाजवळ घडली. या अपघातात सुदैवाने प्राणहानी टळली
अपघातग्रस्त बसचा क्रमांक एमएच- ४०, वाय- ६९०९ आहे. बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांनी आपल्या व्यवस्थेनुसार खासगी दवाखान्यात उपचार घेतले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकाच्या मधोमध उलटली. यात सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेला अडीच तास लोटूनदेखील भद्रावती पोलीस घटनास्थळी पोहचले नाही, महामार्ग पोलीस पथकाने रहदारी मोकळी करुन दिली. (शहर प्रतिनिधी)