शेतकऱ्यांच्या समृद्धतेसाठी सिंचनाला प्राधान्य
By Admin | Updated: March 20, 2017 00:40 IST2017-03-20T00:40:11+5:302017-03-20T00:40:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अनेक योजना राबवितांना सिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या समृद्धतेसाठी सिंचनाला प्राधान्य
हंसराज अहीर : कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोकार्पण
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अनेक योजना राबवितांना सिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे. या अनुषंगाने इंडियन फार्मर्स फर्र्टिलायझर को-आॅपरेटीव्ह लिमिटेड (इफको) ने नागरी येथे बंधारा बांधकाम करून या धोरणाला पुरक असे कार्य केले आहे. यामुळे या भागातील अवर्षण परिस्थिती संपून शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या समद्धीसाठी सतत प्रयत्नशील असून अशी विकास कामे आमच्या प्रयत्नांची यशस्विता स्पष्ट करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
वरोरा तालुक्यातील नागरी येथे इफको इफको पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत पोथरा नदीवर ६२ लाख रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोकार्पण शनिवारला करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी पालकमंत्री संजय देवतळे, इफकोचे विपनन निर्देेशक अरविंदो रॉय, इफकोचे डॉ. वानखेडे, गाडगे, लोंढे, वरोरा पं.स. च्या नवनियुक्त सभापती रोहीणी देवतळे, उपसभापती विजय आत्राम, सरपंच बेबी पिसे, उपसरपंच चंद्रशेखर नौकरकार, भाजपा नेते शेखर चौधरी, रवींद्र कष्टी, बापु धात्रक आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभुत किंमत मिळवून देण्यासाठी केंद्रीय संस्था सीसीआय व नाबार्डला खरेदी करण्यास बाध्य केल्याचे सांगताना शेतकऱ्यांचा माल कमी भावा विकू देणार नाही असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
याप्रसंगी बोलताना माजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी सातेफळ, नागरी व लाडकी येथील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी इफकोच्या मार्फत बंधारा बांधण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार व्यक्त केले.
याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते नागरी येथे पोथरा नदीवर ६२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इफकोच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे निदेशक वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाडगे यांनी तर उपस्थिताचे आभार डॉ. भगवान गायकवाड यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)