प्राचार्य एम. रंगाराजू यांचे स्थानांतरण रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:54+5:302021-03-22T04:25:54+5:30

भद्रावती : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे आयुध निर्माणी उच्च माध्यमिक हायस्कूलचे प्राचार्य एम. रंगाराजू ...

Principal M. Cancel Rangaraju's transfer | प्राचार्य एम. रंगाराजू यांचे स्थानांतरण रद्द करा

प्राचार्य एम. रंगाराजू यांचे स्थानांतरण रद्द करा

भद्रावती : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे आयुध निर्माणी उच्च माध्यमिक हायस्कूलचे प्राचार्य एम. रंगाराजू यांचे काही शिक्षकांच्या केलेल्या तक्रारीवरून येथून दुसरीकडे स्थानांतरण केल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्ग स्थानांतरण रद्द करण्याकरिता आंदोलन करणार असल्याची माहिती पालक संघाचे अध्यक्ष पवन हुरकट यांनी पत्रपरिषदेत दिली.

२२ मार्चला आयुध निर्माणीच्या भांदक चेक पोस्टसमोर आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.

प्राचार्य रंगाराजू या हायस्कूलमध्ये चार वर्षांपूर्वी रुजू झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता स्वतःला झोकून दिले. शाळेव्यतिरिक्त बाहेरची शिकवणे लावणे हे आजच्या काळात फॅड झाले आहे. परंतु त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या शिकवण्या बंद करून शाळेतील शिक्षकांच्या मार्फत विनामूल्य अतिरिक्त तासिका घेणे सुरू केले. शिक्षकांना वेळेच्या आधी शाळेत यावयास लावले आणि शाळा संपल्यानंतर जाणे बंधनकारक केले. सुटीच्या दिवशी अतिरिक्त वर्ग घेणे, थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिनी त्यांच्या जीवनचरित्राची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात शिक्षकांना बंधनकारक केले. त्यांच्या या सर्व कार्यप्रणालीमुळे शिक्षक व्यस्त झाले. त्यामुळे येथील काही वैतागलेल्या शिक्षकांनी येथील एका विद्यार्थिनीला हाताशी घेऊन प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ते तिथेच थांबले नाही तर त्यांचे निलंबन व्हावे यासाठी त्यांनी तक्रारी वरिष्ठांकडे करण्यास सुरुवात केली. याच प्रकारामुळे रंगाराजू यांची चेन्नईमधील आवडी येथील हायस्कूलमध्ये बदली केली. प्राचार्य रंगा राजू हे आयुध निर्माणी येथील हायस्कूलमध्ये रुजू झाल्यापासून वर्ग १ ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बदल घडवून शाळेच्या निकालाचा टक्का वाढविला, अशी माहिती पत्रपरिषदेत पवन हुरकटसह नितीन माशिदकर, गणेश अय्यर, सदानंद येरगुडे, घनश्याम अलोने, फारुख अली, सुभाष कानाडे, तृप्ती हिंरादेवे, शमशाद सय्यद, सुनीता अनमुलवार, सीमा करोड, माधुरी कळमकर, अर्पणा सोनी, मुक्ता तराळे आदींनी दिली.

Web Title: Principal M. Cancel Rangaraju's transfer