१९ सप्टेंबरला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज महामेळावा
By Admin | Updated: September 13, 2016 00:51 IST2016-09-13T00:51:30+5:302016-09-13T00:51:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक भूमिकेच्या संकल्पपूर्तीकरिता राष्ट्रीयकृत बँका...

१९ सप्टेंबरला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज महामेळावा
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक भूमिकेच्या संकल्पपूर्तीकरिता राष्ट्रीयकृत बँका व जिल्ह्यातील विविध शासकीय संस्थांच्या सहभागातून प्रधानमंत्री मुद्रा योजनाअंतर्गत स्वयंरोजगाराकरिता कर्ज महामेळावा, मार्गदर्शन तथा चर्चासत्र सोमवार १९ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कर्ज महामेळावा, मार्गदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अर्थ व वने मंत्री तथा जिल्ह्यातचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजीमंत्री संजय देवतळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे यांचेसह शासकीय अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य आदींची विशेष उपस्थिती लाभणार आहेत.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज महामेळाव्यास विविध संस्था, उद्योजक संस्था व अन्य संस्थाद्वारे स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार असून मुद्रा कर्ज व अन्य शासकीय योजनांची माहिती बेरोजगार युवक, स्वयंरोजगार इच्छूक, पारंपारिक व्यवसायिक, बलुतेदार, कारागीर, लघु उद्योजक, शेतीपुरक व्यवसाय इच्छूक बांधवांना देण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधीद्वारे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेची उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)