विरूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:32+5:302021-04-10T04:27:32+5:30
या बाबीची दखल घेत भाजयुमो सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक हितेश गाडगे यांनी माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या माध्यमातून ...

विरूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करावे
या बाबीची दखल घेत भाजयुमो सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक हितेश गाडगे यांनी माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या माध्यमातून माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत मागणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुरळीतपणे नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी धोटे यांनी शासनाला व आ. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपरोक्त बांधकामास सहा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या बाधकाम विभागाद्वारा उपरोक्त रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, हे रुग्णालय आरोग्य विभागाच्यावतीने हस्तांतरित करून त्वरित सुरू होणे आवश्यक आहे. या रुग्णालयात उपचारासाठी तातडीने साहित्य उपलब्ध करून द्यावे व पद भरती करावी. हे रुग्णालय सुरू झाल्यास त्या क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य तपासणीकरिता इतरत्र जावे लागणार नाही. त्या भागातील नागरिकांना त्वरित उपचार घेणे सोयीचे होईल.
यावर आ. मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संपर्क करून विरुर येथील आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत सूचना वजा आदेश दिले आहेत.