शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वासेऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऑक्सिजनवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:21 IST

Chandrapur : कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आणि औषधींचा तुटवडा असल्याने रुग्णांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा: ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या पूरक सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. सिंदेवाही तालुक्यात चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली असून, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आणि औषधींचा तुटवडा असल्याने वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडल्याचे दिसत आहे.

वासेरा हे चार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे आणि आजूबाजूला २० ते २२ गावांचा परिसर आहे. परिसरात मध्यवर्ती ठिकाण असल्याने मागील २३ वर्षांपूर्वी वासेरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. या आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र येत असून, त्याअंतर्गत परिसरातील एकूण २२ गावातील नागरिकांना आरोग्याची सेवा दिली जाते. या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर्ससह ४ परिचारिका, २ पर्यवेक्षिका, ४ आरोग्य सहायक, ३ शिपाई, २ चौकीदार, १ औषधी वितरक, १ तांत्रिक सहायक, १ लिपिक, अशा अनेक कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली आहे. 

मात्र, मागील अनेक दिवसांपासून या आरोग्य केंद्रात केवळ २ डॉक्टर, १ पर्यवेक्षिका, १ परिचारिका, २ आरोग्य सहायक, २ शिपाई कार्यरत असून, अन्य सर्व पदे रिक्त आहेत. राज्यात आपल्या जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असून, ४३ अंशांवर पारा गेला असल्याने अनेकांना उष्माघाताचा प्रादुर्भाव होत आहे. दुष्काळाच्या काळात शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरिबांना उपचारासाठी याच आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागतो. परंतु, वासेरा येथे अस्तित्त्वात असलेल्या आरोग्य केंद्राची अवस्था खूप वाईट झाली आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, औषधींचा तुटवडा, यामुळे येथील रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे

रुग्णालय, निवासस्थानावर लाखोंचा खर्चया भागातील नागरिकांना आरोग्याची उत्तम सेवा मिळावी, याकरिता शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वासेरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. डॉक्टर, परिचारिका यांना मुख्यालयी राहण्यासाठी उत्तम निवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. मात्र, आज आरोग्य केंद्राची परिस्थिती पाहता रुग्णांना सेवा मिळण्याऐवजी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सेवेकरिता तयार केलेले प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी असून आता शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या आरोग्य केंद्रावर उपचार करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलchandrapur-acचंद्रपूर