धनोजे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By Admin | Updated: July 30, 2015 01:03 IST2015-07-30T01:03:54+5:302015-07-30T01:03:54+5:30
आजचे शिक्षण हे केवळ नोकरी ओरीएंटेड झाले असून त्यातून मुल्यांची शिकवण मिळत नसल्यामुळे सध्याची पिढी उच्च शिक्षित होत असली तरी सुसंस्कृत होताना दिसत नाही.

धनोजे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पाहुण्यांचा सूर : नोकरीधार्जिणे नव्हे, मूल्यांवर आधारित शिक्षणाची गरज
चंद्रपूर : आजचे शिक्षण हे केवळ नोकरी ओरीएंटेड झाले असून त्यातून मुल्यांची शिकवण मिळत नसल्यामुळे सध्याची पिढी उच्च शिक्षित होत असली तरी सुसंस्कृत होताना दिसत नाही. अन्यथा समाजाला वृद्धाश्रमाची गरज पडली नसती, असे विचार अखिल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंकी यांनी व्यक्त केले आहे.
धनोजे कुणबी समाज चंद्रपूरचे वतीने सोमवारी पार पडलेल्या इयत्ता १० वी ते १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ‘शिक्षणाचा अर्थ, अनर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावर मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी विजय वाकूलकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अॅड. पुरुषोत्तम सातपुते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. प्रभा वासाडे, प्रा. रवी झाडे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. आय.डी. कुरेकर, सचिव एल.डी. उरकुडे, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. भास्कर सूर, आयोजन समितीचे सचिव उमाकांत धांडे, नगरसेवक राहुल पावडे, प्रा. निळकंठ बलकी, भाऊराव निखाडे, भाविक येरगुडे, आबाजी देवाळकर, सुधाकर जोगी, अल्का खापणे, सुमित्रा बोढे आदींची उपस्थिती होती.
यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच मुला व मुलींमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या प्रणाली अतकरी, निखील उपरे, तुषार जांभूळकर, रजत झाडे, हर्षदा पिंपळकर, मोहित जीवतोडे, हर्षदा झाडे, हृषिकेश कोटी, प्रिया गौरकार, प्रियंका फरकाडे, शुभम बोभाटे, रूपाली बोढे, मंजुषा उकीनकर, समिक्षा डोंगे, सुरज आस्वले, राहुल डाखरे, स्नेहल धोटे, अंजली ठावरी, कांचन राजुरकर, अनिकेत देठे, गौरव दिवसे, हितेश भुसारी, तृषा नागपुरे, रूपाली मोडक, ओमेश्वरी ढोके, शुभम वराटकर यांना सन्मानित केले. (शहर प्रतिनिधी)