पर्यावरणप्रेमींचा १० जूनला गौरव
By Admin | Updated: June 10, 2017 00:36 IST2017-06-10T00:36:53+5:302017-06-10T00:36:53+5:30
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून १० जून रोजी जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात सकाळी ११ वाजता पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या....

पर्यावरणप्रेमींचा १० जूनला गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून १० जून रोजी जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात सकाळी ११ वाजता पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पर्यावरण प्रेमींचा ‘पर्यावरण मित्र व पर्यावरण रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर प्रमुख अतिथी म्हणून तर अध्यक्षस्थानी दलित मित्र व पत्रकार डी.के. आरीकर राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून चंद्रपूरचे आ. नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनोहर पाऊणकर, प्रशांत बांबोळे, सीटीपीएसचे अभियंता जयंत बोबडे आदी उपस्थित राहणार आहेत.