अपात्र लाभार्थ्याला धान्य मिळण्यावर बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:29+5:302021-02-05T07:43:29+5:30
राज्यातील कार्यतर बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापनाकार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी १ फेब्रुवारी ते ...

अपात्र लाभार्थ्याला धान्य मिळण्यावर बसणार चाप
राज्यातील कार्यतर बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापनाकार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. शोधमोहिम राबविताना शिधापत्रिकाधारकांची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी कागदपत्राची तपासणी होणार आहे. यामध्ये ज्ञात वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा अधिक आहे त्याची शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच त्याच्या मागणीनुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्यात येणार आहे.
बॉक्स
नमुना अर्ज भरावा लागणार
तपासणी मोहिमेमध्ये रास्तभाव, अधिकृत शिधावाटप दुकान, तलाठी यांच्यामार्फत नमुना अर्ज वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण कागदपत्राच्या आधारे हा नमुना अर्ज भरुन पोचपावती घ्यायची आहे. यासोबत रहिवासी पुरावा व संपूर्ण कागदपत्रे संबंधित विभागातील कर्मचारी व तलाठी क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करणार आहेत. यामध्ये संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे.