‘त्यांच्या’ कार्याची घेतली राष्ट्रपतीने दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:39+5:302021-02-05T07:37:39+5:30

शंकरपूर येथे ३० मे रोजी अडीच वर्षांची शिवन्या बारेकर विहिरीजवळ खेळत होती. खेळता खेळता ती विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी ...

The President took notice of 'their' actions | ‘त्यांच्या’ कार्याची घेतली राष्ट्रपतीने दखल

‘त्यांच्या’ कार्याची घेतली राष्ट्रपतीने दखल

शंकरपूर येथे ३० मे रोजी अडीच वर्षांची शिवन्या बारेकर विहिरीजवळ खेळत होती. खेळता खेळता ती विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी तिचे वडील प्रभाकर बारेकर यांनीसुद्धा विहिरीत उडी घेतली. परंतु दोघे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. या दोघा बापलेकीचे नशीब बलवत्तर होते म्हणून तिथूनच पेट्रोलिंग करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विनोद जाभळे व पोलीस शिपाई परमेश्वर नागरगोचे फिरत होते. त्यांना विहिरीजवळ गर्दी दिसताच वाहन थांबवून विहिरीजवळ गेले. बापलेक पाण्यात गटांगळ्या खात दिसताच पोलीस शिपाई परमेश्वर नागरगोजे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ३५ फूट खोल विहिरीत उडी मारून या बाप-लेकीचे प्राण वाचविले. त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी त्यांचा सत्कार केला, पण या कार्याची दखल देशाच्या राष्ट्रपतींनी घेऊन गणराज्यदिनी त्यांना उत्तम जीवनसुरक्षा राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले.

Web Title: The President took notice of 'their' actions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.