विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू
By Admin | Updated: June 9, 2014 23:33 IST2014-06-09T23:33:17+5:302014-06-09T23:33:17+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा पहिला टप्पा म्हणून विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणआणि मतदार यादीत नाव

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू
चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा पहिला टप्पा म्हणून विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणआणि मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम प्रशासनाकडून हाती घेतली जाणार आहे.
या तयारीसंदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिलीे. ९ जून ते ३१ जुलै दरम्यान विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम आणि २१ जून, २२ जून, २८ जून व २९ जून या दिवशी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
९ मार्चला राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत प्राप्त झालेल्या नवीन अर्जांची छाननी केली असता, काही मतदारांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांच्या नावाचा अंतर्भाव यादीत झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधितांनी खात्री करुन कागदपत्राची पुन्हा पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. राबविण्यात येणार्या विशेष मोहिमेत विनंती केल्याशिवाय कुणाचेही नाव वगळले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यादीत नाव नोंदविण्यासाठी राबविण्यात येणार्या विशेष मोहिमेसाठी मतदार सहाय्यता केंद्र प्रत्येक तालुक्यात सुरु केले आहेत. या केंद्रावरसुध्दा नाव नोंदणीचे अर्ज स्विकारण्यात येतील. यासाठी नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष मोहिमेच्या दिवशी म्हणजे २१, २२, २८ व २९ जून या सुट्टीच्या दिवशी प्रत्येक मतदार केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदार यादीत नाव नोंदणी संबंधीत अर्ज स्विकारतील. मान्यताप्राप्त राजकिय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता नेमणूक करण्यास निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार ते उपस्थित राहून सहकार्य करू शकतील, असेही ते म्हणाले.
९ जून रोजी प्रारुप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे ूँंल्ल.िंल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहेत. मतदारांनी आपले नाव यादीत असल्याचे खात्री करुन घ्यावे व नसल्यास अर्ज नमुना ६ भरुन यादीत नाव समाविष्ट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी केले. (प्रतिनिधी)